Friday, July 14, 2006

अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन?

एकच चहा, तो पण कटिंग
एकच पिक्चर, तो पण टॅक्स फ़्री
एकच साद, ती पण मनापासुन
अजुन काय हवे असते मित्राकडुन?

एकच कटाक्ष, तो पण हळूच
एकच होकार, तो पण लाजुन
एकच स्पर्श, तो पण थरथरून
अजुन काय हवे असते प्रियेकडुन?

एकच भुताची गोष्ट, ती पण रगवुन
एकच श्रिखंडाची वडी, ती पण अर्धी तोडुन
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडुन
अजुन काय हवे असते आजीकडुन?

एकच मायेची थाप, ती पण कुरवाळून
एकच गरम पोळी, ती पण तुप लावुन
एकच आर्शिवाद, तो पण डोळ्यात आसवे आणुन
अजुन काय हवे असते आईकडुन?

एकच कठोर नकार स्वैराचराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेवुन
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोगर्‍अया आवाजातुन
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहुन
अजुन काय हवे असते वडिलांकडून?

सगळ्यांनी खुप कही दिले, ते पण नमागुन,
स्वर्गच जणू मिळाला, तो पण नमरुन,
फाटकी झोळी माझी, ती वाहिली भरुन
अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन?

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home