Monday, July 31, 2006

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता
पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

Friday, July 28, 2006

आमचे देशप्रेम सरले का???

शंडांची अवलाद....
कधी बदलणार नाही.
किती ही स्फोट झाले तरी..
आम्ही सुधारणार नाही.

घरात घुसुन शेजारी
आमची मुलेबाळे मारणार.
आम्ही मात्र
भारत-पाकमैत्रिचे पुल बांधणार.

मेरा भारत महान..
मेरा भारत महान.
मुलायमचा लाडके..
सिमी अन पाकिस्तान.

वाटते कधी तरी मनाला,
मी ही अतिरेकी बनावे.
माझ्या हातुनही शेजाऱ्याचे,
पार्लमेंट हाऊस उडावे.
त्यांचा असेल जिहाद..???
आमचे धर्मयुद्ध कुठे???
स्वत:ला पुरुष म्हणवणारे.
सगळे झोपले कुठे???

त्यांनी मारायचे..
आम्ही बघायचे
इतकेच हाती उरले का?????
शेजाऱ्यावर प्रेम करता करता
आमचे देशप्रेम सरले का???
आमचे देशप्रेम सरले का???

Thursday, July 27, 2006

शिवा पाहिजे ॥

अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान ।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा रायगडावर
मराठ्यांचा दावा पाहिजे

हर हर महादेव
'हवा' पाहिज'
हवा' पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे

Wednesday, July 26, 2006

कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है,
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है.
मन का विश्वास रगों में साहस भरता है,
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है.
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है,
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है.
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में,
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में.
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो,
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो.
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम,
संघर्श का मैदान छोड़ कर मत भागो तुम.
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

By,
Harivansh Rai Bacchan

Sunday, July 23, 2006

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे......... कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,

म्हणुन....................म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

Saturday, July 22, 2006

आठवतो परी मजला

रातराणी, मोगरा, आणि होता गंध निशिगंधाचा
आठवतो परी मजला तो स्पर्श चंद्रहासाचा

दुपार उलटली नुरला हवेतला मुळी दाह
मंद मंद आणित असे वात संध्याकाळ

केवळ दोन कळ्या आज असती वेलावरती
इवली पाने त्यांस अपुल्या कडेवरी खेळवती

दिनकरा देउनि निरोप तयार अधीरश्या झाल्या
पऱ्या गोजिऱ्या लगबग तयांची चंद्राच्या स्वागता

अंधारा पळवून लावाया पेटविले मिणमिणते दिवे
कुठून मिळवले अत्तर तयांनी कसा केवडा घमघमे

झाली अधीर सायंकाल कराया साजरा मग उत्सव
नाजूक हसू उमटले जेव्हा लागली साजणाची चाहूल

रेशमी तलम मेघांचा पडदा दूर त्यास सारून
अवतरले आकाशी मग राजे शशीशेखर

खुलल्या कळ्या चंद्रहासाच्या होऊन लाजेने चूर
धवल नितळ कांती तयांची खुले रजनीच्या कुशीत

आणि बघता बघता फुलली फुले ती चंद्रहासाची दोन
नाचते स्रुष्टी अन नभी नक्षत्रे पसरला चहूकडे उल्हास

रातराणी, मोगरा, आणि होता गंध निशिगंधाचा
आठवतो परी मजला तो स्पर्श चंद्रहासाचा .....

आता असं करू या.....

आता असं करू या
अनोळखी होऊ या पुन्हा
अन बघू या , घडतोय का
पुन्हा तोच गुन्हा

वाटेल का तुला तेच
नव्याने माझ्याबध्दल ?
की आता नक्की झाला आहे
तुझ्यामध्ये बदल ?

खरंच का आवडणार नाही
माझं तुझ्यामागे लागणं?
खरंच तू म्हणणार नाहीस
"ईश्श्य ! काय रे तुझं वागणं !"

काय हरकत आहे ,
दोन चार पावसाळे मागे जायला?
अन पुन्हा एकदा तसंच
मनसोक्त भिजायला?

हे मिळमिळीत जगणं...
करूया का चटकदार?
चल होऊन जाऊ पुन्हा
एकाच गुन्ह्याचे भागीदार !

!!!वैभव जोशी !!!

Monday, July 17, 2006

आठवण आली तुझी की

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..

जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...
पण तरिही.........

आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....

Friday, July 14, 2006

अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन?

एकच चहा, तो पण कटिंग
एकच पिक्चर, तो पण टॅक्स फ़्री
एकच साद, ती पण मनापासुन
अजुन काय हवे असते मित्राकडुन?

एकच कटाक्ष, तो पण हळूच
एकच होकार, तो पण लाजुन
एकच स्पर्श, तो पण थरथरून
अजुन काय हवे असते प्रियेकडुन?

एकच भुताची गोष्ट, ती पण रगवुन
एकच श्रिखंडाची वडी, ती पण अर्धी तोडुन
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडुन
अजुन काय हवे असते आजीकडुन?

एकच मायेची थाप, ती पण कुरवाळून
एकच गरम पोळी, ती पण तुप लावुन
एकच आर्शिवाद, तो पण डोळ्यात आसवे आणुन
अजुन काय हवे असते आईकडुन?

एकच कठोर नकार स्वैराचराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेवुन
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोगर्‍अया आवाजातुन
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहुन
अजुन काय हवे असते वडिलांकडून?

सगळ्यांनी खुप कही दिले, ते पण नमागुन,
स्वर्गच जणू मिळाला, तो पण नमरुन,
फाटकी झोळी माझी, ती वाहिली भरुन
अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन?

सभोवतालच्या ओळखीच्या चेहऱ्यात अनोळखीही असतात काही

सभोवतालच्या ओळखीच्या चेहऱ्यात अनोळखीही असतात काही
डोळे जरी फ़सले तरी मन कधीच फ़सत नाही..
आपणच पटववून देत असतो अनोळखीतील ओळख मनाला,
दिवस उलटले की आपण, पून्हा एकदा ओळखतो स्वत:ला..
अगदी जवळचे चेहरेही कधी कधी ओळख हरवून बसतात,
काही गोष्टी मात्र चेहरे नसूनही खुप ओळखीच्या वाटतात..
धडधडत्या ह्र्दयाला कूठे असतो असा स्वत:चा चेहरा,
पण त्यातील प्रत्येक ठोका असतोच ना आपला?
कागदावरचे शब्दही हा नियम मोडत नाहीत,
कधी मी त्यांना तर कधी ते मला ओळखत नाहीत

Wednesday, July 05, 2006

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंन्द मोहरते
मन उधाण वारयाचे
गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवर्ते
मन उधाण वारयाचे
गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वारयाचे

आकाशी स्वप्नांच्या हरपुन भान शिरते
हुरहुरत्या सान्जेला कधी एकटेच झुलते
सावरते बावरते झडते अडखते का पडते
कधी आशेच्या हिन्दोळ्यावर
मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फ़िरते
अणि शःणात फ़िरुनि आभाळाला भिडते

मन उधाण वारयाचे
गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वारयाचे
गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वारयाचे

ऋणझुणते गुणगुणते
कधी गुणते ते हरवते
कधी गहिरया डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बाबडे नकळत का भर्रकटते
कधी मोहाच्या चार शणांना मन हे वेडे भूलते
जाणते जरी हॆ पुन्हा पुन्हा का चूकते
भाबडे तरी भासांच्या मागुन पळते

मन उधाण वारयाचे
गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वारयाचे
गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वारयाचे

Tuesday, July 04, 2006

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात ......

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात गोड बोलण्यानंच होते
सगळ्या प्रेमकथांची अखेर मटार सोलण्यानंच होते!

प्रेमात दोघं असतात तेंव्हा सगळं गुलाबी वाटत असतं
एकमेकांना प्रेमानं दिलेलं पाणीही शराबी वाटत असतं
प्रेमकथांची सुरुवात अशीच पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र (तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!

प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा 'हात' एकमेकांसाठी धरले असतात
दोघंजणं एकमेकांसाठी राजा-राणी बनले असतात
प्रेमकथांची सुरुवात अशीच एकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र एकमेकांना झब्बू देण्यानं होते!

प्रेमामधे एकमेकांबद्दल जे जे काही कळलं असतं
संसारात त्याच गोष्टींवरून एकमेकांना छळलं जातं
प्रेमकथांची सुरुवात अशीच कळूनही न कळण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र छळून छळून छळण्यानं होते!

एकमेकांच्या वागण्यामधे आपल्याला फक्त चुका दिसतात
एकमेकांच्या शब्दांमधे चाबूक आणि बंदुका दिसतात
जे जे होणार नाही वाटतं ते ते सारं घडत जातं
प्रेमकथेच्या शेवटी शेवटी सारं सारं बिघडत जातं!