Saturday, August 19, 2006

पुन्हा तू येशील का ?......

पुन्हा तू येशील का ?......
बेरंग या जीवनात माझ्या
रंग पुन्हा तू भरशील का ?
सुन्या सुन्या या आयुष्यात माझ्या
साथ द्यायला पुन्हा तू येशील का ?

रीक्त झालेल्या या ओंजळीत माझ्या
पुन्हा फुले तू ठेवशील का ?
कोमेजल्या पाकळ्या जेंव्हा
रुतलेले काटे तू काढशील का ?

नेहमी प्रमाणे उशीरा का होई ना
भेटीला परत माझ्या तू येशील का ?
तुझ्या सहवासतील त्या क्षणांचा
पुन्हा अनुभव तू देशील का ?

सांजवेळी वाहतो जेंव्हा शांत वारा
आठवण माझी तूला येते का ?
ज़ीवनाच्या वाटेवर मला एकटा सोडला
याची खंत तूला वाटते का ?

दूर माझ्या पासून जताना
तुझ्या ही डोळ्यात अश्रू दाटले होते का ?
तूझी आठवण ये उन साठलेल्या अश्रूंना
वाट देण्यासाठी तरी परत येशील का ?

जेंव्हा जेंव्हा आठवण तूला माझी येईल
हाक पुन्हा तू मारशील का ?
बेसूर झालेल्या ह्या जीवनगाण्याला
सूर पुन्हा तू जोडशील का ?

पडलेल्या या प्रष्णांना माझ्या
उत्तर तू कधी देशील का ?
सुन्या सुन्या या आयुष्यात माझ्या
साथ द्यायला पुन्हा तू येशील का ?......
साथ द्यायला पुन्हा तू येशील का ?......

ĦÃŖŠĦĄĿ™

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home