Saturday, August 19, 2006

प्रेमास आपुल्या ह्या

प्रेमास आपुल्या ह्या
काय हे स्वरूप आले,
होती शरीरे दूर नुसती
आज मनही दूर झाले...

तूझा स्पर्ष झाला तेंव्हा
पूर्ण अंग आनंदाने शहारले,
तू आज जवळ नाहीस म्हणून
डोळ्यात फ़क्त या अश्रू तरळले...

पावसात इंद्रधनू पाहताना
स्वप्ने आपण बरीच बघितली,
तू साथ सोडली हे कळताच मात्र
रंगांनेही या पाठ फिरवली...

नदीच्या काठी बसून एकमेकांना
वचने आपण दिली होती,
ओसरला आठवणींचा पूर जेंव्हा
हातात फ़क्त वाळूच होती...

तू कधी येशील पून्हा म्हणून
तूझ्या परतीची वाट मी पहात आहे,
ज्या वाटेने गेलीस तू निघून
तीथेच आजही मी उभा आहे...

आज् ही विचार करतो मी
कुठे काय उणे राहीले,
प्रेमास आपुल्या ह्या
काय् हे स्वरूप आले...

हर्षल !!!

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home