Sunday, October 08, 2006

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला,
वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं..
कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला,
कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला,
सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला,
माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

- अभिजीत दाते

1 Comments:

Blogger Yuga_Parivartak said...

पण जाऊ दे जमलंच नाही ..

pan mala jamlaaa hey sagla....

9:44 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home