Saturday, August 19, 2006

कायमचा

सरणावरती रचलेला मी, निघुन गेलो कायमचा
सरता सरता कवितेतुन मी, उरुन गेलो कायमचा

अगदी अगदी मरणाकाठी, वाट पाहिली तुझी मी
अंती आली लाट अशी मी, बुडून गेलो कायमचा

फुला-फुलांना ठाऊक आहे, गुज तुझे नि माझे गं
तू गेली मज टाकून अन मी, हरवून गेलो कायमचा

वारा वारा म्हणता म्हणता, वादळ आले मोठे दारी
लपलो मग मी घरात जेथे, अडकून गेलो कायमचा

अजुनी जातो मोहरूनी मी, आठवतो गं स्पर्श तुझा
त्या स्पर्शाच्या अटकेतुन मी, सुटून गेलो कायमचा

सरता सरता कवितेतुन मी, उरुन गेलो कायमचा

संतोष (कवीतेतला)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home