Thursday, June 29, 2006

एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...

Sunday, June 25, 2006

दुखा:च्या घरी...

दुखा:च्या घरी...

दुखा:च्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानॊ"!
बिलकुल लाजू नका
ईतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!
मनात खुप साठले आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता रहावत नाही....

मी आणि सुख: दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षाचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखा:चा हात सुटला!

तेव्हा पासून फिरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख:' माझा
कुणाच्या ही नजरेत!!!!

Wednesday, June 21, 2006

जयोऽस्तु ते

जयोऽस्तु ते

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्यही तूची
स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहम् यशोयुतां वंदे!

मोक्ष-मुक्ती ही तुझीच रूपे तूलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहम् यशोयुतां वंदे!

-विनायक दामोदर सावरकर

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामान्च्या अभन्गाचा अर्थ
आता थोडा कळायला लागलाय,
तो बरोबर आहे ना.. हे विचारयला...
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

शिवराय



शिवरायाचे आठवावे रुप ।
शिवरायाचे आठवावा प्रताप ।
शिवरायाचे आठवावा साकशेप ।
भूमडळी.....
समर्थ रामदास.

एक मावळा!!

समर भुमिचे सनदी मालक,
षत योध्याचे मानकरी...
रणफ़न्दिची "जात" आमची,
...कोण आम्हा भयभित करी!
जय महाराष्ट्र,
एक मावळा!!

दाटून आलेल्या संध्याकाळी

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधुन कधी सापडत नाही
मागुन कधीच मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणुन टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तरहा असतात
सारय़ा सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफ़ल विफ़लतेला
खरतरं काहिच महत्व नसतं
ईथल्या जय पराजयात
ऎकच घहीरं सार्थक असतं

मात्र ते भोघण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी उन्हासारखं