Sunday, October 08, 2006

मैत्री

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...

कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...

आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.........

माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...

सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.....
कोऱ्य़ा माझ्या आयुष्यात मैत्रीचे चित्र तू चितारले,
प्रेमाच्या सप्तरंगात ते चित्रही नाहून निघाले...

पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..
जीवनाच्या चित्रपटलावर वेगळेचं रंग रंगवणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी......

पहिली भेट

पहिली भेट,
पहिल्या परिक्षेसारखी!
उत्तराची वाट पाहणाऱ्या अगतिक प्रश्नासारखी...

पहिल्या भेटीत..
एकमेकांची नजर चुकवून एकमेकांना पहायचं असतं,
स्वत: मात्र साळसूदपणे चेहेऱ्याआड लपायचं असतं!

पहिल्या भेटीत..
अगदी सावधपणे वागायचं असतं,
हसतानाही चेहेऱ्यावरचं खोटं गांभीर्य जपायचं असतं!

पहिल्या भेटीत..
एकमेकांना समजायचं असतं,
निदान जे समजलं नाहीतेच कळलंय असं दाखवायचं असतं!

पहिल्या भेटीत..
अनेक शंकांचं ओझं वहाय्चं असतं,
'त्याच्या' सोबत आपणही स्वत:ला
अपेक्षांच्या तराजूत तोलायचं असतं!

पहिल्या भेटीत..
मनातून खूप काही बोलायचं असतं,
नेमकं अशाच वेळी ओठांनी
जिभेवरल्या शब्दांना आवरायचा असतं!

पहिल्या भेटीत..
सतत घड्याळ निरखायचं असतं,
एकमेकांच्या काट्यांमध्ये इतक्या लवकर गुंतायचं नसतं!

पहिल्या भेटीत..
त्याने "काय घेणार?" विचारायचं असतं,
मग ती मेनू कार्ड पाहताना त्यानं
हळूच खिशातलं वॉलेट चाचपायचं असतं!

पहिल्या भेटीत..
'ती' जे काही मागवेल,
ते 'त्यानं' मुकाट्यानं खायचं असतंनाही आवडलं तरी,
"किती छान डीश आहे!"असं आवंढा गिळून म्हणायच असतं!

kishor

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला,
वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं..
कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला,
कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला,
सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला,
माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

- अभिजीत दाते

क्षितीज

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.

आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं

Saturday, August 19, 2006

प्रेमास आपुल्या ह्या

प्रेमास आपुल्या ह्या
काय हे स्वरूप आले,
होती शरीरे दूर नुसती
आज मनही दूर झाले...

तूझा स्पर्ष झाला तेंव्हा
पूर्ण अंग आनंदाने शहारले,
तू आज जवळ नाहीस म्हणून
डोळ्यात फ़क्त या अश्रू तरळले...

पावसात इंद्रधनू पाहताना
स्वप्ने आपण बरीच बघितली,
तू साथ सोडली हे कळताच मात्र
रंगांनेही या पाठ फिरवली...

नदीच्या काठी बसून एकमेकांना
वचने आपण दिली होती,
ओसरला आठवणींचा पूर जेंव्हा
हातात फ़क्त वाळूच होती...

तू कधी येशील पून्हा म्हणून
तूझ्या परतीची वाट मी पहात आहे,
ज्या वाटेने गेलीस तू निघून
तीथेच आजही मी उभा आहे...

आज् ही विचार करतो मी
कुठे काय उणे राहीले,
प्रेमास आपुल्या ह्या
काय् हे स्वरूप आले...

हर्षल !!!

सुकलेली फुलं

सुकलेली फुलं

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

-------------------------- जगदिश

प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...

नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो,
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...


तिच्या चेहरयाला चन्द्र म्हणण्याची
त्याची सवय काही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरीही
त्याने जीद्द सोड्लेली नसते
तिच्या सॊन्दर्य़ाचे गुणगाण करण्याचा छन्दच जणू त्याला जड्लेला असतो
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...


पान-टपरी वाल्याकडे त्याची अगदी महिनो-महीने उधारी असते
तरी तिच्यासाठी चन्द्र आणण्याची त्याची एक पायावर तयारी असते
तिच्यासथि काहिही करण्याचा निर्धार, त्याच्या मनात खोल्वर दड्लेला असतो
कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो........

तिच्यासाठी गुलाब तोड्ताना तो
कधी काट्यान्ची तमा बाळगत नाही
आणि ती; सोबत असेपर्यन्त त्याला,
दुखः कधीच उमगत नाही,
तिच्या क्षणभर दुराव्यानेही, तो दुखः सागरात बुडालेला असतो

कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो........

बर याला प्रेम म्हणाव, तर
लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात
आणि नुकतच प्रेमात पड्लेल्या त्या दोघानकडून
अगदी शुद्ध प्रेमाची आशा करतात,

अश्याच समाज कन्टकामुळे, प्रत्येकजन प्रेमात रखड्लेला असतो,
तरी, प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...

एकदा तरी प्रेमात पडलेला असतो... एकदा तरी प्रेमात पडलेला असतो... ॥॥

नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो,
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...


तिच्या चेहरयाला चन्द्र म्हणण्याची
त्याची सवय काही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरीही
त्याने जीद्द सोड्लेली नसते
तिच्या सॊन्दर्य़ाचे गुणगाण करण्याचा छन्दच जणू त्याला जड्लेला असतो
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...


पान-टपरी वाल्याकडे त्याची अगदी महिनो-महीने उधारी असते
तरी तिच्यासाठी चन्द्र आणण्याची त्याची एक पायावर तयारी असते
तिच्यासथि काहिही करण्याचा निर्धार, त्याच्या मनात खोल्वर दड्लेला असतो
कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो........

तिच्यासाठी गुलाब तोड्ताना तो
कधी काट्यान्ची तमा बाळगत नाही
आणि ती; सोबत असेपर्यन्त त्याला,
दुखः कधीच उमगत नाही,
तिच्या क्षणभर दुराव्यानेही, तो दुखः सागरात बुडालेला असतो

कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो........

बर याला प्रेम म्हणाव, तर
लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात
आणि नुकतच प्रेमात पड्लेल्या त्या दोघानकडून
अगदी शुद्ध प्रेमाची आशा करतात,

अश्याच समाज कन्टकामुळे, प्रत्येकजन प्रेमात रखड्लेला असतो,
तरी, प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...

एकदा तरी प्रेमात पडलेला असतो... एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...

असं कोणीतरी असावं.....

चांदण्या रात्री आकाशाकडे बघून
ढगांच्या पलिकडचे जग पहावं,
कुशित घेऊन तारे मोजावे वाटावं
असं कोणीतरी असावं

धगधगत्या आयुष्यात विसावा घ्यावा
ज्वलंत जीवनाचे चित्र निर्माण करावं
हातात हात घेऊन चालत रहावं
असं कोणीतरी असावं

ओलावलेल्या पापण्यांच्या कडा पुसून
थेट ह्रदयापर्यंत पोचावं,
असं नक्षत्रासारखं
कोणीतरी असावं....

.....वैभव आव्हाड

तुटलेल्या ह्रदयास...!!!

तुटलेल्या ह्रदयास...!!!
संमपला हा खेळ सरा
मन अता आवर तु,
छिन्न-विछिन्न पडलेले
स्वप्न तुझे सावर तु

रडु नको तु ह्रुदया
तुला अधिकार तो नाही,
या निर्दयी निष्ठूर दुनियेत
प्रेमाला किंम्मत नाही

केलिस चुक तु
निस्वार्थ प्रेम करुनी,
जग आता फक्त तु
आठवनिंचा हात धरुनी

अनुभवे समजली मला
रित हि जगण्याची,
प्रित म्हनजे जीवन नव्हे
वाट आहे मरणाची

हात सोडला सगळ्यांनी
कोणी साथ देत नाही,
अशा कठिण समयी
म्रूत्त्युही हात देत नाही

करु नको तु आशा
आता नवजीवनाची,
या अंधकारी दुनियेत
फक्त वाट पहा मरणाची...

कणाद गुट्टे

पुन्हा तू येशील का ?......

पुन्हा तू येशील का ?......
बेरंग या जीवनात माझ्या
रंग पुन्हा तू भरशील का ?
सुन्या सुन्या या आयुष्यात माझ्या
साथ द्यायला पुन्हा तू येशील का ?

रीक्त झालेल्या या ओंजळीत माझ्या
पुन्हा फुले तू ठेवशील का ?
कोमेजल्या पाकळ्या जेंव्हा
रुतलेले काटे तू काढशील का ?

नेहमी प्रमाणे उशीरा का होई ना
भेटीला परत माझ्या तू येशील का ?
तुझ्या सहवासतील त्या क्षणांचा
पुन्हा अनुभव तू देशील का ?

सांजवेळी वाहतो जेंव्हा शांत वारा
आठवण माझी तूला येते का ?
ज़ीवनाच्या वाटेवर मला एकटा सोडला
याची खंत तूला वाटते का ?

दूर माझ्या पासून जताना
तुझ्या ही डोळ्यात अश्रू दाटले होते का ?
तूझी आठवण ये उन साठलेल्या अश्रूंना
वाट देण्यासाठी तरी परत येशील का ?

जेंव्हा जेंव्हा आठवण तूला माझी येईल
हाक पुन्हा तू मारशील का ?
बेसूर झालेल्या ह्या जीवनगाण्याला
सूर पुन्हा तू जोडशील का ?

पडलेल्या या प्रष्णांना माझ्या
उत्तर तू कधी देशील का ?
सुन्या सुन्या या आयुष्यात माझ्या
साथ द्यायला पुन्हा तू येशील का ?......
साथ द्यायला पुन्हा तू येशील का ?......

ĦÃŖŠĦĄĿ™

आज अचानक.......................

आज अचानक.......................
"आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या शणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या शणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा"

sandeep

बालपण पुन्हा नटवायचं असतं

बावीस वर्षं आतापर्यंतची, सरली कशी कळलंच नाही,
नववी-दहावीत खुरटलेली दाढी, भरभर वाढलेली वळलंच नाही.

दाढीनं नेहमी वाढायचंच असतं,
एकविसानं बावीस व्हायचंच असतं,
आपण मात्र हाती धरून पेनाचा रेझर,
"क्लीन शेव्ह्ड" बालपण सदैव नटवायचं असतं.

इसापनीती हातची जाऊन फ़िजिक्स आलेलं कळलं नाही,
केमिस्ट्रीनं केलेली हकालपट्टी अकबर-बिरबलालासुद्धा वळलीच नाही.

मॅथेमॅटिक्ससुद्धा असंच अभ्यासायचं असतं,
इंजिनिअरींगच्या ऍडमिशन्ससाठी ताटकळायचं असतं,
मेकॅनिक्सचा पेपर देऊन झाल्यावरसुद्धा,
पंचतंत्र पूर्वीसारखंच वाचायचं असतं.

शाळेतल्या रिकाम्या खिशांची जागा,
पॉकेटमनीनं घेतलेली कळलीच नाही,
बर्थ-डे पार्टीज, रोझ डे, फ़्रेंडशिप डे ची माया,
कबड्डी, खो-खो तेथे रुळलीच नाहीत.

कॉलेजच्या कँटीनचं पेप्सी नि कोक,
मित्रमैत्रिणींसोबतच घशाखाली ढकलायचं असतं,
आपण मात्र नंतर देताना ढेकर,
चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं.

"बालिशपणा आता पुरे झाला एव्हढा", म्हणणारे बाबा,
षष्ट्यब्दीपूर्तीशी आलेले कळलंच नाही,
"जाऊद्या जरा, खेळूद्या त्याला,"ची आउची माया,
पडद्याआड कधी सरली समजलंच नाही.

आपणसुद्धा कोणीतरी इंजिनिअर, डॉक्टर काहीतरी व्हायचं असतं,
नोकरीधंदा करून काहीतरी कमवायचं असतं,
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून,
आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.

Chakrapani C

कायमचा

सरणावरती रचलेला मी, निघुन गेलो कायमचा
सरता सरता कवितेतुन मी, उरुन गेलो कायमचा

अगदी अगदी मरणाकाठी, वाट पाहिली तुझी मी
अंती आली लाट अशी मी, बुडून गेलो कायमचा

फुला-फुलांना ठाऊक आहे, गुज तुझे नि माझे गं
तू गेली मज टाकून अन मी, हरवून गेलो कायमचा

वारा वारा म्हणता म्हणता, वादळ आले मोठे दारी
लपलो मग मी घरात जेथे, अडकून गेलो कायमचा

अजुनी जातो मोहरूनी मी, आठवतो गं स्पर्श तुझा
त्या स्पर्शाच्या अटकेतुन मी, सुटून गेलो कायमचा

सरता सरता कवितेतुन मी, उरुन गेलो कायमचा

संतोष (कवीतेतला)

१५ ऑगस्ट आला.....

१५ ऑगस्ट आला.....
...प्रशांत रेडकर.

आला आला आला....
१५ ऑगस्ट आला.
खरच माझा देश,
या दिवशी स्वतंत्र झाला???

धर्म मोठा, जात मोठी,
कोण मरतोय देशासाठी???
इथे कोणी खुश आहे,
कारण जोडुन आली सुट्टी.

गल्लोगल्ली पुन्हा एकदा,
कागदी ध्वज सजणार.
तेच बिचारे दुसऱ्या दिवशी,
......रस्त्यावर असणार.

हंड्या फोडण्यामधेच आता..,
आमचा पुरुषार्थ उरणार का???
सलामी देऊन टाळ्या मिळतील..,
देशासाठी कुणी काही करणार का???

कधीतरी

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...


कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...


कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...


कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...


कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...


कधीतरी तू मला असं वचन देशील ?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो
यातच मग मला समाधान असेल...

हर्षल !

Wednesday, August 09, 2006

तेव्हा मला समजलं....तिला माझी एकही कविता कळत नाही

ती माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी
वाट बघत थांबायची....

दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....

तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....

एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही

सिव्हगड

सिव्हगड

वाट वाकडी वळणे अवघड
खड्या चढाचा उभार वक्शी
बुलन्द पहाडी गडी रान्गडा
कोट छातीचा गडास रक्शी

रूप तयाचे कणखर राकट
काळा कातळ हिरवी माती
दुरुनी तयाचे दर्शन घडता
फुलून येते निधडी छाती

सिव्ह् मराठी इथे झुन्जले
रक्त सान्डूनी अजिन्क्य झाले
घोरपडीला दोर बान्धूनी
स्वर्गावरती चालून गेले

आवळ मुठित त्या मर्दान्च्या
उन्च फडफडे भगवा झेन्डा
जरब तयाची अभाळाला
त्रिवार झुकुनी करीते मुजरा

Writen by Anand

Thursday, August 03, 2006

कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस...............

तेव्हाही होताच की हा गार पावसाळा
रिमझिमणा-या सरींचा कोसळणा-या धबधब्यांचा
पण त्याच्यांतली नि:शब्दता कधी जाणवलीच नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस...............

तेव्हाही होतच होती रोज संध्याकाळ
रूपेरी किरणांचा असा तो काळ
पण ती कातरवेळ कधी अनुभवलीच नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस...............

तेव्हाही स्वप्नांच्या देशा जायचे मन
मग मी जगायचो तिथला प्रत्येक क्षण
परतल्यावर कधीच कोणाची आठवण झाली नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस...............

तेव्हाही जीवनाच्या वाटेवर चालतच होतो
कधी सुखात तर कधी दु:खात
पण कधी सोबतीची गरज वाटलीच नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस...............
-श्रीकांत लव्हटे

Monday, July 31, 2006

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता
पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

Friday, July 28, 2006

आमचे देशप्रेम सरले का???

शंडांची अवलाद....
कधी बदलणार नाही.
किती ही स्फोट झाले तरी..
आम्ही सुधारणार नाही.

घरात घुसुन शेजारी
आमची मुलेबाळे मारणार.
आम्ही मात्र
भारत-पाकमैत्रिचे पुल बांधणार.

मेरा भारत महान..
मेरा भारत महान.
मुलायमचा लाडके..
सिमी अन पाकिस्तान.

वाटते कधी तरी मनाला,
मी ही अतिरेकी बनावे.
माझ्या हातुनही शेजाऱ्याचे,
पार्लमेंट हाऊस उडावे.
त्यांचा असेल जिहाद..???
आमचे धर्मयुद्ध कुठे???
स्वत:ला पुरुष म्हणवणारे.
सगळे झोपले कुठे???

त्यांनी मारायचे..
आम्ही बघायचे
इतकेच हाती उरले का?????
शेजाऱ्यावर प्रेम करता करता
आमचे देशप्रेम सरले का???
आमचे देशप्रेम सरले का???

Thursday, July 27, 2006

शिवा पाहिजे ॥

अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान ।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा रायगडावर
मराठ्यांचा दावा पाहिजे

हर हर महादेव
'हवा' पाहिज'
हवा' पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे