Sunday, October 08, 2006

मैत्री

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...

कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...

आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.........

माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...

सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.....
कोऱ्य़ा माझ्या आयुष्यात मैत्रीचे चित्र तू चितारले,
प्रेमाच्या सप्तरंगात ते चित्रही नाहून निघाले...

पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..
जीवनाच्या चित्रपटलावर वेगळेचं रंग रंगवणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी......

पहिली भेट

पहिली भेट,
पहिल्या परिक्षेसारखी!
उत्तराची वाट पाहणाऱ्या अगतिक प्रश्नासारखी...

पहिल्या भेटीत..
एकमेकांची नजर चुकवून एकमेकांना पहायचं असतं,
स्वत: मात्र साळसूदपणे चेहेऱ्याआड लपायचं असतं!

पहिल्या भेटीत..
अगदी सावधपणे वागायचं असतं,
हसतानाही चेहेऱ्यावरचं खोटं गांभीर्य जपायचं असतं!

पहिल्या भेटीत..
एकमेकांना समजायचं असतं,
निदान जे समजलं नाहीतेच कळलंय असं दाखवायचं असतं!

पहिल्या भेटीत..
अनेक शंकांचं ओझं वहाय्चं असतं,
'त्याच्या' सोबत आपणही स्वत:ला
अपेक्षांच्या तराजूत तोलायचं असतं!

पहिल्या भेटीत..
मनातून खूप काही बोलायचं असतं,
नेमकं अशाच वेळी ओठांनी
जिभेवरल्या शब्दांना आवरायचा असतं!

पहिल्या भेटीत..
सतत घड्याळ निरखायचं असतं,
एकमेकांच्या काट्यांमध्ये इतक्या लवकर गुंतायचं नसतं!

पहिल्या भेटीत..
त्याने "काय घेणार?" विचारायचं असतं,
मग ती मेनू कार्ड पाहताना त्यानं
हळूच खिशातलं वॉलेट चाचपायचं असतं!

पहिल्या भेटीत..
'ती' जे काही मागवेल,
ते 'त्यानं' मुकाट्यानं खायचं असतंनाही आवडलं तरी,
"किती छान डीश आहे!"असं आवंढा गिळून म्हणायच असतं!

kishor

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला,
वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं..
कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला,
कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला,
सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला,
माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

- अभिजीत दाते

क्षितीज

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.

आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं